PR-वास........

PRवासातला प्रवास

इथे आहोत तोवर भरपूर फिरून सगळे पोर्तोरीको पालथे घालायचे असे ठरवले होते, म्हणून वीकेंडला बाहेर पडलो. समुद्राकाठचं "inn" बुक केलं होतं, ते आमच्या घरापासून २ तासावर होतं. तरी माझी केवढी तयारी चाललेली! एक मोठी डफेल बॅग आणि एक बीच बॅग, वर एक खाऊची/पाण्याची मोठी पिशवी झाली. 

हे सगळं करतांना, मला अचानक माझ्या लहानपणी केलेले अनेक प्रवास आठवायला लागले. माझी आई उत्तम नियोजक आणि अतिशय व्यवस्थीत सामान भरून घेत असे, त्यामुळे आम्हाला कधीच "अरे, हे घ्यायचं राहिलं!" असा प्रश्न आल्याचं आठवत नव्हतं. पण तिच्या आणि माझ्या पॅकिंग-यादीत खूपच फरक होता! म्हणून म्हटलं एक तक्ता करू! जग केवढं बदललंय, तरी बऱ्याच गोष्टी अजून तशाच आहेत का? 
मला सुचेल तशी यादी केली, पण तुम्हाला काही आठवलं, तर नक्की सांगा! 

आई
मी
१.      कपडे वाळत घालायची दोरी, चपलांचा एकच जोड, कपड्याचा व अंगाचा साबण (त्यांच्या वेगवेगळ्या डब्यांतून ठेवलेला), एक क्रीम.

स्नीकर, स्विमशूज, चपला. कपड्याचा साबण कधीच नाही, उलट लागतील तेवढे कपडे. अंगाचा साबण, शॅंपू वगैरे ठेवायच्या पारदर्शक प्लॅस्टिक डब्या, कारण आजकाल साबण वडी नसून, बॉडीवॉश असतो! सनस्क्रीन, डास-कीडे न चावायचा स्प्रे, डीओ, दातांचा फ्लॉस, मेकअप.
२.      गार पाण्याचा कूलकेग, हा फारच महत्त्वाचा होता, कारण स्वच्छ पाणी मिळण्याची सोय असेलच असं नाही. (hydrating ची टूम पाण्यापर्यंतच मर्यादित होती).
बॉटल्ड पाणी आले, तरी त्यावरही फारसा विश्वास नसल्यामुळे, आणि प्रत्येकवेळी पाण्यासाठी पाण्यासारखे पैसे घालवायचे नसल्यामुळे, ३ पाण्याच्या बाटल्या, आणि त्या गार ठेवायला “आईसबॉक्स”. शिवाय, जूसची लहान पाकिटे किंवा टेट्रा पॅक- to keep hydrating!
३.      प्रत्येकी एक टॉवेल.
कानाला बांधायचे रूमाल. हे माझ्या आयुष्यात फारच महत्त्वाचे, कारण कानाला वारं लागलं, की सर्दी ठरलेली!
हॉटवॉटर बॅग. ही का घेत असत, हे अजूनही कळलेलं नाही. शेक घेण्याइतके कोणीच आजारी/वयोवृद्ध नव्हतो.

क्रोसीन, व्हिक्स. 
टॉवेलची गरज नाही. जिथे जातो तिथे भरपूर उपलब्ध असतात. तरीही, बीचवर जायला, आणि छोट्याला लागला तर, म्हणून खास आपला “पंचा”. टर्किश टॉवेलचे ओझे कोण बाळगेल?
टोप्या, हेअरबॅण्ड.
छोट्याचे डायपर (मलाच मानसिक आधार म्हणून).
डबा भरून ओले-वाईप्स (ज्याने ह्याचा शोध लावला तो द्रष्टा! जे पुसायचे, तेच नव्हे, तर काहीही पुसता येते!)

प्रथमोपचाराची डबी. कार्टूनचे बॅण्डेड.

४.      दहीभात, पराठे, लोणचे, खाऊ ठेवायला स्टील-प्लॅस्टिकचे डबे. फळे कापायला खरी सुरी (सुरक्षा-जांच वगैरे प्रकार नसल्यामुळे), चमचे, पाण्याची भांडी रेल्वेच्या बेसिनमधे धुवून पुन्हा वापरायची. दुपारी खायला चटणी-सॅन्डविच, चिवडा.
झिपलॉक बॅग किंवा दह्याचे जुने डबे, जे परत आणायला नकोत. पीनट बटर सॅन्डविच
दुपारी खायला बेदाण्याची छोटी खोकी, ट्रेल-मिक्स, चिप्स. 
चॉकलेट दुधाचे टेट्रा पॅक, व प्यायचे ५-६ स्ट्रॉ! 
खरंतर हॉटेलात मिळतात, पण वाटेत लागले तर?

५.      होल्डॉल मधे टॉवेल-कपड्यांची सेफ्टीपिन लावलेली उशी, खाली घालायला व पांघरायला चादरी.
हवा फुगवून करायची उशी, कार/प्लेन मधे मानेला आधार देणारी.
६.      जिथे जिथे हॉटेल बूकिंग असेल, तिथल्या फोन नंबर, पत्त्यांची डायरी. काही ठिकाणी नुसते फोन-आरक्षण असायचे, पण काही हॉटेलांनी पोच-पावती म्हणून पोस्टकार्ड पाठवलेली असायची.
इंटरनेट वरून छापलेल्या रसीदा. फोन-डायरी हा प्रकार आता इतिहासजमा.
७.      पैसे. वेगवेगळ्या ठिकाणी चतुराईने लपवलेले, व सगळ्यांना आठवणीने सांगितलेले. चेकबुक (असावे).
टॉर्च!!
क्रेडिट कार्ड.
कॅमेरा, त्याच्या २-३ अवजड लेन्सेस, बॅटरीचार्जर, कारमधले फोन चार्जर, (तरी आमच्याकडे अजून आयपॅड/टॅबलेट आलेली नाही).
८.      बाबा कडेवर घ्या! थोडंच चाल बेटा. मग घेतो.
स्ट्रोलर.
९.      चेन, कुलूप.
फ्रिजबी, बॉल, वाळूत खेळायची खेळणी.
१०.  रेनकोट व छत्री.
फोल्डींग बीच खुर्च्या, बीच छत्री.
११.  पुस्तके, पत्ते, (माझ्या भावाच्या शब्दात) कंचे
पुस्तके.





No comments:

Post a Comment