“अरे तुला आईबाबांनी नवीन कुर्ता दिलाय तो घाल की!”
“नको, त्यापेक्षा शॉर्टस घालून गेलो तर काय बिघडतंय?”
“का पण? कुर्ता छान दिसतो!”
“छे- तू तर असं म्हणणारच. पण मला आता कितीही नटलो तरी काहीच चांगलं दिसणार नाहिये ह्या टकलामुळे...”
“हो- एक केस काय गेले, तर तुम्हा लोकांना डिप्रेशनच येतं. आणि वर म्हणायला मोकळे- की बायकोने केला छळ, म्हणून केस झाले विरळ! इथे आमच्या वाढणाऱ्या वजनाचं आणि गळणाऱ्या केसांचं कोणाला दिसत नाही मेलं! ”
“अगं- सुट्टीच्या फोटोत चांगलीच जाड दिसत्येस! येवढ्या तरूणपणी एवढं वजन वाढलेलं चांगलं नाही. म्हणजे, गैरसमज नको, पण एक आपलं वाटलं म्हणून सांगितलं.” ----ह्यांना आमच्या हवाईच्या फोटोमधे सुंदर समुद्रकिनारा दिसायचा सोडून नेमके माझे जरा जास्त वर आलेले गालच का दिसावे?
खरंच, आपल्या असण्यामधे दिसण्याचं किती महत्त्व असतं नाही? मी लहान असतांना आजीबरोबर खूप प्रवचनं, आध्यात्मिक व्याख्यानांना जायची. त्यामुळे जग हे मिथ्या आणि आत्मा सत्य वगैरे डोक्यात बसलं होतं. त्यामुळे दिसायला चारचौघात बरी असूनही त्याचा गर्व करू नये, हा प्रयत्न तरी केला. एक माझे झिपरे आणि पातळ केस सोडले, तर बाकी स्वत:च स्वत:च्या रूपाच्या प्रेमात पडू नये, असं काहीही मला दिसत नव्हतं. (काय करणार? प्राप्ते तु शोडषे वर्षे.......) आणि तरीही, रूपाशी जोडलेल्या व्यक्तित्त्वाच्या पुढे जाऊन आपलं काहीतरी असावं, अशी प्रखर इच्छा होती. येवढंच नव्हे, तर केवळ रूप बघून कोणी आपल्या प्रेमात पडू नये, असंच वाटायचं. आणि दिसण्यामधे आपलं लक्ष कमी करण्यात यश आलं असं वाटत असतांनाच काय एकेक साक्षात्कार होत जातात-
- की आजकाल आपल्याला फोटो काढून घ्यायला आवडत नाही. आणि काढलेच, तर त्यातली स्वत:ची इमेज चट्कन विसरून जायला फारसे कष्ट लागत नाहीत.
- आजकाल आपण जुने लग्नाचे फोटो बघून, “काय ना मी तेव्हा smashing होतो!” असं एकमेकांना दाखवत बसतो.
- आजकाल नवीन कपडे घेणं नकोच वाटतं, कारण मॉलच्या फिटिंग रूम मधे तो शर्ट घालून बघितल्यावर, “हाच का तो शर्ट जो पुतळ्याला घातलाय?” असा प्रश्न पडतो.
- घालायला गेलो, की कपाटात एकही धड कपडा दिसत नाही.
- ट्यूबलाईटपेक्षा मंद पिवळा प्रकाश जास्त आवडायला लागतो, त्यात चेहऱ्यावरचे काळपट डाग ऊठून दिसत नाहीत.
- भारतात गेल्यावर सगळ्यात आधी लोकांकडून, “अभिप्राय.” ऐकून घ्यावे लागणार, त्याची चीड आणि मानसिक तयारी करावी लागते.
- तिथल्या लोकांची overweight ची व्याख्याच कशी चुकलिये, तिथल्या लोकांनी आपल्याला १० वर्षांपूर्वी पाहिलंय आणि आता त्यांच्या डोक्यात तीच image फिट्ट बसलीये, त्यामुळे असं होतं, हे समजुन घेण्याचा प्रयत्न.
- येवढंच नव्हे तर, त्या लोकांना दुसरं काही बोलणं सुचत नसेल, किंवा चक्क आपल्याविषयी jealousy पोटी असं बोलत असतील, असे सोयीस्कर समज करून घेणे.
खरंच मी दिसण्याच्या बाबतीत इतकी sensitive होते, हे आजवर माझं मलाच जाणवलं नव्हतं. का बरं आपल्या self-image ची, आणि लोकांनी बनवलेल्या image ची कधी सांगड घालता येत नाही? शेवटी मी म्हणजे मीच आहे ना, आणि मला मीच आवडत नसेन तर जगण्यालाच काही अर्थ उरत नाही, इथपर्यंत तो self-image चा निराशाजनकप्रवास जाऊन पोचतो.
मग स्वत:चाच नव्हे, तर सगळ्या जगाचा राग राग येऊन माणूस अगदी विरक्तीपर्यंत जाऊन पोचतो. म्हणजे आलीच का पुन्हा आजीची, “जग मिथ्या आत्मा सत्य..” वाली फिलॉसॉफी! उगीच नाही प्लेटोच्या पुतळ्याचे केस मला विरळ वाटले...... :) :)
hehehehe! mast! :D
ReplyDeleteखरय.
ReplyDeleteपण काही लोक दिसण्याच्या बाबतीत इतके sensitive असतात त्यांच्या बाबतीत गालीब म्हणतात,
आइना देख अपनासा मुह लेकर रह गयी
साहीबको दिल न देनेपर कितना गुरुर था
कासीद ही गर्दन अपने हाथो ना मारीये
ये उसकी खता नही मेरा कसुर था
आपला ब्लॉग मस्त आहे
Yasho: Thanks.
ReplyDeleteHarekrishnaji: Thanks, pan to sher kahi kalla nahi buva farsa :(
Fakta khoop changla ahe te kalla...
wow! you are writing एक से एक बढिया!
ReplyDeleteभारतात असताना माझ दिसण, कपडे सर्व गोष्टींकडे माझे अतिशय लक्ष असायच. कधीही कपडे इस्त्री करूनच घालण, आपल्या एरिया बाहेर शूज़ घालूनच जाण. पण अमेरीकेत आल्यावर ह्या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष झालं. इकडच्या कॉलेज स्टुडंट्सची फॅशन आपल्याला शोभणार नाही आणि दिसण्यात त्यांच्याशी स्पर्धा करण्यात काहीच अर्थ नाही असे वाटल्याने बहुद्धा. पण बर्गर आणि बरेच फ़ास्ट फूड आरोग्याला चांगले नाही तेंव्हा त्याची काळजी घ्यावी. दिसण्यात काही नाही हे खर आहे, म्हणून त्याकडे पुर्णपणे दुर्लक्षही करणे योग्य नाही.
सारांश
ReplyDeleteतिला आपल्या रुपाचा एवढा गर्व होता की आपण कधीच कोणाला आपले दिल देणार नाही याची खात्री होती.
पण जेव्हा तिने आरशात स्वःताचे रुप पाहीले तेव्हा ती त्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबाच्याच प्रेमात पडली व स्वःतलाच दिल देवुन बसली.
Silence: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. वजनाकडे लक्ष द्यायचं ते चांगलं दिसण्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठी आणि इथे अमेरिकेत बरंच तेल, लोणी, चीज खाल्लं जातं ते बरं नव्हे... पण एकूण मलाच माझी मजा वाटली, की इतकं कसं माणसाला डिप्रेशन येऊ शकतं दिसण्यावरून!
ReplyDeleteहरेकृष्णजी: वा! बहोत खूब! हा गालिबचा शेर अगदी ह्या विषयाला समर्पक आहे. आधी आपण स्वत:च्याच प्रेमात पडतो, त्यातूनच तर सगळे घोळ होतात पुढे :)