PR-वास........

10/15/08

दोन प्रसंग.

प्रसंग एक: शंभर संवादांचे फसलेले प्रयत्न?

शाळेतला एक टिपिकल तास- थोडं वाचायचं, थोडं लिहायचं, थोडी मस्करी, थोडी चर्चा!
कधीकधी होतं असं, मी शिकवायच्या तंद्रीत काहीतरी बोलते. एक मुलगा बाजुच्याशी काहीतरी बोलतांना दिसतो. मी थोड्या विनोदाने त्याला विचारते, "काय रे, हे तुझं नक्की वाचून झालंय ना, कि उगीच टिवल्याबावल्या चालल्याहेत?"
तो एकदम लालबूंदच होतो-
"तुम्ही नेहमी मलाच का फैलावर घेता?? मी वाचून आलोय. मला आवडतंय हे पुस्तक. शी...........सगळा मूड घालवला! What do you know about what I'm doing?" त्याच्या डोळ्यात आता पाणी. मी एकदम भांबावलेली. (असं काय बोलून गेले की त्याला येवढं लागलं???)
तरातरा उठून तो चालायला लागतोय, आणि वर्गाच्या बाहेर जातांना दिसतोय, तोवर माझं भान परत आलं.

"Pete, you're not going anywhere." तो तरीही दारात अडखळला, मी त्याच्या मागे धावले. "Come back in. You are not going out of the classroom without my permisson."
तो कसाबसा आत आला.
"I don't understand, why you have pick on me every f***ing time? I was reading, I've read it. I do my work."
आता माझा पारा चढलेला. "Watch your language mister. Who do you think you are? I think the whole class will agree that I was doing it in good humor! No offense, there was nothing malicious behind those words! तू जरा वर्ग संपल्यावर मला भेट, हे तुझं वागणं काही बरोबर नाही."- मी त्याला ठणकावून सांगितलं. सगळा वर्ग २ मिनिट चिडीचूप. मीच जरा खोल श्वास घेऊन शांत होते, आणि पुढे सुरू करते. एकीकडे त्याचं मात्र अजूनही लाल झालेलं नाक पुसणं चालू होतं. मग मलाच कीव आली. काय मी बोलले त्याला असं?

"काय रे, बाहेर जाऊन पाणी पिऊन येतोस का?"
"नाही मी ठीक आहे आता."
"ओके." चला तर मग. नेहमी प्रमाणे तास संपतो. तो मधे मधे उत्तरंही देतो, कधी ग्रूपमधल्या लोकांशी बोलतो. वर्ग संपल्यावर तो थांबतो, आणि मी त्याला सांगते,
"अरे chill out! आणि तुझं तोंड आवर आधी. थोडं शांत रहावं..."
" हो सॉरी, मला माहिती नाही काय झालं होतं- मी दुसराच विचार करत होतो....माझीच चूक होती. सॉरी."
असं म्हणून तो गेलाही. पण मलाच काय झालं तेवढ्यात की काही सुचेना.
मुलांचा वांडपणा झेलता झेलता कधीकधी विसरायला होतं ना, की त्यांच्याही भावना असतात, व्यक्तिमत्व असतात... दिवसभरात कोण त्यांच्याशी कसं वागलं, गेल्या पिरियड्ला परीक्षेत किती मार्क मिळाले? उशीर झाला म्हणून सकाळी कोणी ओरडलं तर नसेल? एक ना दोन, हजार गोष्टी त्यांनाही सहन कराव्या लागतात ना?
ती वेळ मी निभावून नेली म्हणून ठीक, पण माझ्या स्वरात एक अंशाचाही तिरकसपणा असू शकला असेल- तर खरं मीच त्याची माफी मागायला हवी होती, असा विचार त्या क्षणीच मला अस्वस्थ करून गेला.
शाळेत असतांना मी मार तर कधी खाल्लाच नाही, पण अभ्यासातही लक्ष होतं, म्हणून अक्षरश: १० वर्षात एकदाही ओरडा खाल्ल्याचं आठवत नाही. हूड विद्यार्थी असतात, त्यांना शिकवणं चांगलं जमतं म्हणे- कारण मुलांची नस त्यांना माहीती असते. त्या दृष्टीने मी तर एक पायरी मागेच आहे. हे त्या मुलामुळे मला कळलं.
कधीकधी न शिकवणाऱ्यांना जे दिसत नसतं, ते असं अचानक पुढे येऊन उभं राहतं- प्रत्येक मुलाशी तुमचं एक वेगळं नातं असतं. त्यांचे हावभाव, त्यांच्या आवडीनिवडींशी सतत एकरूप होतांनाही शंभरातल्या एकाच वेळी त्यांच्याशी संवाद साधण्यात यश येतं. बाकी फक्त Grading, Rules, Meanings and Contexts...
आता २० वर्षांनी जर तो मुलगा मला भेटला, तर त्याला आणि मला, काय लक्षात राहील? १०० संवादांचे फसलेले प्रयत्न? की एक संवाद झाला, पण तोही कडवट, त्याची आठवण?
पण नाही, उद्याचा दिवस आहे, पुन्हा प्रयत्न करता येईल. उद्या त्याचा मूड ठीक असला, तर एखाद जोक मारून बघावा म्हणते! :) :) :)

==================================================

प्रसंग २: You are one agressive young lady!

परवा वर्गातल्या एका मुलीच्या पायावर खोक. मी विचारलं तर म्हणाली,
"तुम्हाला Section B मधली जेन माहितिये? आम्ही फुटबॉल खेळतांना तिने मला किक मारली."
"ओSSS, मुद्दाम की काय गं?"
"नाही नाही, बॉलचा अंदाज आला नाही तिला. पण मिस. डी., तुम्ही तिला माझ्याकडून जरा दटावून ओरडाल का???" तिचा खट्याळपणा डोळ्यातून सांडत होता. "तुम्ही तिला जरा जास्त रागवत जा! ती तशी बरीच आहे!"
"होSSS तू म्हणतेस तर मी आता बघ तिला सोडत नाही अजिबात." (मी ही तिच्या विनोदात सामिल झाले.)
दुसऱ्या दिवशी मला जेन वर्गात शिरतांना दिसली.
"ए जेन, तू म्हणे मेरीला किक मारलीस?"
बोरायेवढे मोठ्ठे डोळे करून ती, "तिने तुम्हाला सांगितलं?????????? काहीSS काय???"
"हो, आणि तिच्या मते मी तुझ्यावर अजून जास्त ओरडायला पाहिजे!"
आता तिला तिच्या चुगलखोर मैत्रिणीचा राग यायला लागला होता. "छे, ती काही ही सांगतेय. मी काय मुद्दामहून मारली नव्हती किक.........तुम्ही तिच्यावर का विश्वास ठेवता? माझ्यावर का नाही?" तिने जी गाडी सोडली, ती काही थांबेना. मग मी, "अग बाई हो, हो. You are one agressive young lady, it seems to me!"

आता मात्र ती जे खिदळायला लागली, की थांबेचना. माझ्या भारदस्त शब्दांची तिला भारीच मज्जा वाटलेली असावी. मग दिवसभर तेच चाललं होतं- "मी का म्हणून agressive? ती का नाही?"

ते झालं, आणि दोन दिवसांनी मेरी, आणि जेन, दोघीही माझ्याकडे एकत्र आल्या, "आम्ही Science Lab साठी एक Video बनवतोय. तुम्ही त्यात काम कराल का?"
मी चाटच पडले. "हो करू शकते, पण किती वेळ लागेल? नक्की करायचं तरी काय आहे?"
" काही नाही. तुम्ही फक्त हो म्हणा."
"हो."
"अच्छा, तर मग शाळेनंतर येऊ" म्हणून त्या अदृश्य.
शाळेनंतर आल्या, तर मुकुट वगैरे घेऊन. काय त्यांचा विषय होता ते मला नीटसं कधीच कळलं नाही, पण मेरी माझा मुकुट चोरणार, आणि मग मला ओरडायचं होतं, "You are one aggressive young lady!" मी मुकुट घालून एकदम तय्यार झाले, आणि मलाच इतकं हसू यायला लागलं :) काय पण माझ्या विनोदाचं सार्थक झालं!

अशा प्रकारे एका इंग्रजी नाटकात काम केल्याचा अनुभव माझ्या Resume मधे लागला. किती छोट्या गोष्टींनी जिंकता येतं मुलांना, असा विचार करत होते, तोच कामचुकार रायन पुढे उभा राहिला.
पण ती गोष्ट पुन्हा कधीतरी........

3 comments:

  1. Where the hell is your RSS/Atom feed?

    ReplyDelete
  2. शिक्षकाच्या जिवनातील दोन प्रसंग! अगदी दोन टोकाचे, एकात उतावीळ्पणा आहे तर दूस-यात सामंजस्य! घरच्या वातावरणचे प्रतिबिंब शिक्षकाला सहज वाचता येउ शकणारे. भारतातील स्थिती आता भिन्न होउ लागली आहे. विद्यार्थ्याच्या जिवनात डोकावायला आता शिक्षकाला वेळच पुरत नाही. ८०/९० विद्यार्थ्याना शाळेत संभाळणे, खरच कठीण होत आहे. विद्यार्थी उमलताना दिसत नाहीत की फुलतानाही! एखाद्याचे कौतुक करायलाही शिक्षकाला वेळ नाही,विनोद करणं दूरच! विद्यार्थ्याला आता शाळेतील अपेक्षीत क्लासेस मध्ये मिळतय असा काहींचा समज आहे.पण शाळेमध्ये education बरोबरच जिवन शिक्षण मिळते हे आता सर्वच विसरू लागले आहेत. व्यवहाराची शाळा आता संस्कारवर्गांप्रमाणे सुरु कराव्या लागतील असच बनतय वातावरण! एक किंवा दोनाच्या संसारात मुले एकाग्र होण्यापेक्षा एककल्ली होताना दिसताहेत. त्यांच्या व्यथा, त्यांचे डोळ्यातले भाव बघायला आजी आजोबांना स्थान नाही, आईवडिलांना वेळ नाही आणि शिक्षकांना आवड नाही अशी वेगळीच स्थिती अनुभवायला येत आहे

    ReplyDelete
  3. प्राजक्ता,
    तुमच्या प्रत्येक शब्दातील शिक्षकी तळमळ सहज जाणवते. शिक्षकाने वर्गातील सर्व मुलांचे दोन मिनीटं फक्त डोळे जरी बघीतले, तरी त्याला त्या दिवशी कॊणाशी बॊलणे आवश्यक आहे हे निश्चित कळेल. मुलं द्वाड, टारगट, मस्तीखॊर असली तरी त्याला शिक्षणात प्रवृत्त करण्यासाठी खरच कसली आवश्यकता आहे हे लगेच कळून येते. मुलं खोटंही बोलतात कधी कधी!घरची परिस्थिती त्यांना भरपूर वेळा अभ्यासातून दूर ओढते. हे वाक्य गरिब व श्रीमंत दोघांनाही समान लागू आहे. आई वडील दोन्ही कामावर असले आणि कोणीच लक्ष देत नसेल तर प्रश्न अधिक बिकट! आई वडिलांनी किमान एक तास मुलांसाठी देणे अत्यंत आवश्यक आहे. मध्यमवर्गात तो निश्चित दिला जातो तेथील मुले शिक्षणात निश्चित पुढे जातात.ज्या अधन अथवा सधन वर्गातही जेव्हा मुलाकडे नियमीत लक्ष दिले जाते ती मुले जिवनात यशस्वी होताना दिसतात

    ReplyDelete