असं का होतं? जे खरंच, अगदी मनापासून लिहायचं असतं, त्याच्याच साठी शब्द का सापडू नयेत? दु:खाबद्दल लिहणं सोपं असतं म्हणतात, पण दिवाळीच्या प्रकाशाने उजळलेल्या मंगल संध्याकाळच्या आनंदाबद्द्ल कसं लिहावं?
काल पाडवा झाला. घरी दोघंच होतो, आणि इथल्या नियमांमुळे पणत्यांऐवजी टी-लाईट्स लावले, दिव्यांची माळ सोडली, आणि थंडीत कुडकुडत सूप पीत बसलो! ह्यावेळी खरं भारतात जायचं होतं, पण नाहीच जमलं- आणि तेंव्हा वाटून गेलं- आधीची मी असते, तर "घरची" आठवण काढून बादल्या बादल्या रडले असते- पण आता, हे आमच्या दोघांचं विश्व किती सुबक आणि सुरक्षित वाटतंय! लाडू चिवड्याचे बकाणे भरतांना एखादी आठवण ताजी होते, तेवढीच. बाकी हा वर्तमान, त्या दिव्यांच्या मंद ज्योतीसारखा इथल्या कडाक्यातही अखंड तेवतो आहे. त्याचीच ऊब सगळीकडे आमच्या Central Heating सारखी पसरली आहे!
दिवाळी म्हणून ना सुट्टी होती, ना कुठे जाण्याची लगबग. तर मग ikea तून नुकतं आणलेलं फर्निचर जोडत बसलो. काडीकाडी जोडून पक्षी घरट्यात संसार मांडतात म्हणे- आम्ही आपले power screwdriver आणि ikea manual घेऊन सज्ज झालो. माझ्या साठी एक workstation बनवायचं होतं. माझी हौस म्हणून सरळ दोन मोठ्या bookcases न घेता, एक निमुळती, एक रूंद, अशी मांडणी करता करता पाठ तुटायला आली, पण घर जरा लागल्यासारखं झालं.
एरवी कुरकुर करणारा नवरा, आज निमूट घाम गाळत होता, ते पाहून मलाच कसंतरी झालं.
मग मी नवऱ्याला म्हटलं, "चल, तुला ओवाळते, आणि होहोबा (jojoba) तेलाने मसाज करते मस्तपैकी. मग तू आंघोळ करायची तर कर, नाहीतर उद्यापर्यंत मुरू दे...!"
अगदी सोफ्याखाली रांगोळी काढण्यापासून दोघंच होतो तरी कपडे बदलण्यापर्यंत छान तयारी केली. मी ओवाळतांना म्हटलं, "मग काय आहे माझी ओवाळणी?"
"आता येवढं सामान घेतलं, घर तुझ्या मर्जीने सजवलं, तरी पुन्हा ओवाळणी मागतेय बयाबाई!" असं उत्तर ऐकायला कान अगदी सरावले होते, तेवढ्यात...
"मी काहीच जास्ती देऊ शकत नाहिये तुला पाडव्याला, फक्त Dunkin Donuts मधून कॉफीसाठी हे घे!" अगदी चेहरा पाडून त्याने मोजून दोन डॉलर माझ्या ताम्हनात टाकले. बहुतेक स्वारी घरी येतायेता पाडव्याबद्द्ल पार विसरली असावी. करोडोपती झालास तरी कॅश साठी बायकोकडे हात पसरायचे- नेहमीची सवय. त्यामुळे पाकिटात जेवढे होते, त्याने भागवायची वेळ आली होती.
त्या क्षणी त्याचा गोडूला बिच्चारा चेहरा बघून जे माझ्या पोटात कालवलं, ते शब्दात पकडायचा खूप प्रयत्न केला- नाही जमलं. मी सरळ त्याच्या गळ्यात गळाच टाकला, आणि एकच शब्द सुचला, "कृतज्ञता". किती मागतो आपण आयुष्याकडून, आणि मला आजवर ते सगळंच मिळत गेलं. सहजच. कधीकधी, न मागताही! कधीकधी मागायच्याही आधी.
किती गृहित धरतो आपल्या अपेक्षा, आणि त्या अपेक्षांची पूर्तीही! पण कधीच का सांगू शकत नाही येवढ्या आनंदाबद्द्ल, की ज्याने डोळे भरून येतात- अगदी दिवाळीच्या दिवशीही???
तो मिळाला, त्या क्षणीच माझी ओवाळणी तर मला मिळाली होती! काल पाडवा झाला. घरी दोघंच होतो, आणि इथल्या नियमांमुळे पणत्यांऐवजी टी-लाईट्स लावले, दिव्यांची माळ सोडली, आणि थंडीत कुडकुडत सूप पीत बसलो! ह्यावेळी खरं भारतात जायचं होतं, पण नाहीच जमलं- आणि तेंव्हा वाटून गेलं- आधीची मी असते, तर "घरची" आठवण काढून बादल्या बादल्या रडले असते- पण आता, हे आमच्या दोघांचं विश्व किती सुबक आणि सुरक्षित वाटतंय! लाडू चिवड्याचे बकाणे भरतांना एखादी आठवण ताजी होते, तेवढीच. बाकी हा वर्तमान, त्या दिव्यांच्या मंद ज्योतीसारखा इथल्या कडाक्यातही अखंड तेवतो आहे. त्याचीच ऊब सगळीकडे आमच्या Central Heating सारखी पसरली आहे!
दिवाळी म्हणून ना सुट्टी होती, ना कुठे जाण्याची लगबग. तर मग ikea तून नुकतं आणलेलं फर्निचर जोडत बसलो. काडीकाडी जोडून पक्षी घरट्यात संसार मांडतात म्हणे- आम्ही आपले power screwdriver आणि ikea manual घेऊन सज्ज झालो. माझ्या साठी एक workstation बनवायचं होतं. माझी हौस म्हणून सरळ दोन मोठ्या bookcases न घेता, एक निमुळती, एक रूंद, अशी मांडणी करता करता पाठ तुटायला आली, पण घर जरा लागल्यासारखं झालं.
एरवी कुरकुर करणारा नवरा, आज निमूट घाम गाळत होता, ते पाहून मलाच कसंतरी झालं.
मग मी नवऱ्याला म्हटलं, "चल, तुला ओवाळते, आणि होहोबा (jojoba) तेलाने मसाज करते मस्तपैकी. मग तू आंघोळ करायची तर कर, नाहीतर उद्यापर्यंत मुरू दे...!"
अगदी सोफ्याखाली रांगोळी काढण्यापासून दोघंच होतो तरी कपडे बदलण्यापर्यंत छान तयारी केली. मी ओवाळतांना म्हटलं, "मग काय आहे माझी ओवाळणी?"
"आता येवढं सामान घेतलं, घर तुझ्या मर्जीने सजवलं, तरी पुन्हा ओवाळणी मागतेय बयाबाई!" असं उत्तर ऐकायला कान अगदी सरावले होते, तेवढ्यात...
"मी काहीच जास्ती देऊ शकत नाहिये तुला पाडव्याला, फक्त Dunkin Donuts मधून कॉफीसाठी हे घे!" अगदी चेहरा पाडून त्याने मोजून दोन डॉलर माझ्या ताम्हनात टाकले. बहुतेक स्वारी घरी येतायेता पाडव्याबद्द्ल पार विसरली असावी. करोडोपती झालास तरी कॅश साठी बायकोकडे हात पसरायचे- नेहमीची सवय. त्यामुळे पाकिटात जेवढे होते, त्याने भागवायची वेळ आली होती.
त्या क्षणी त्याचा गोडूला बिच्चारा चेहरा बघून जे माझ्या पोटात कालवलं, ते शब्दात पकडायचा खूप प्रयत्न केला- नाही जमलं. मी सरळ त्याच्या गळ्यात गळाच टाकला, आणि एकच शब्द सुचला, "कृतज्ञता". किती मागतो आपण आयुष्याकडून, आणि मला आजवर ते सगळंच मिळत गेलं. सहजच. कधीकधी, न मागताही! कधीकधी मागायच्याही आधी.
किती गृहित धरतो आपल्या अपेक्षा, आणि त्या अपेक्षांची पूर्तीही! पण कधीच का सांगू शकत नाही येवढ्या आनंदाबद्द्ल, की ज्याने डोळे भरून येतात- अगदी दिवाळीच्या दिवशीही???
...................................
मग आम्ही जोडीने भेंडीची भाजी आणि फ्रोझन पोळ्या जेवलो, आणि सोफ्यावर बसून जोडीने निवडणूक-विशेष बघायला लागलो :) :) :)
hehehe
ReplyDeleteamachi diwalihi agadi ashich zali...ovalaNisakaT..don dollarachya
haha! kay tumhi lok - don dollar var katavta :D :D
ReplyDeleteविशाखाजी...
ReplyDeleteस.न.वि.वि.
नभाचा किनारा आवडला .
आपण ओवाळणी चा आनंद शब्दात समर्थपणे व्यक्त करून दाखविला .ग्रेट....
किप इट आप.
छान. अगदी मनापासून लिहीलत.
ReplyDeleteइतका गोड नवरा आहे, असं जाणवल्यावर किती छान वाटतं ना? :)
Kharach khup chan mandala aahes....kadhi kadhi navare aase god vagtat..
ReplyDelete