दिवाळी आली, दिवाळी आली
दीप उजळले घरा घरा
त्या दीपांच्या तेजाने
न्हाऊन उठला सारी धरा!
दिवाळी आली, दिवाळी आली
आली नरकचतुर्दशी
देवाजीच्या देवळात
भक्तजनांची गर्दी खाशी!
दिवाळी आली, दिवाळी आली
आले लक्ष्मीपूजन
हळदीकुंकु करायला
मुली बसल्या नटून
दिवाळी आली, दिवाळी आली
आला तसाच पाडवा
ह्या दिवशी लहानांनी
मोठ्यांचा आशिर्वाद घ्यावा!
दिवाळी आली, दिवाळी आली
भाऊबीजही आली
बहिणीने भावाकडून
भेट काही उकळली!
दिवाळी आली, दिवाळी गेली,
फटाक्यांचे बार थांबले
तेव्हापासून आम्हा मुलांना
शाळेचे वेध लागले!
ही दीपावली तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबियांना आनंदाची जाओ........
ReplyDelete