PR-वास........

4/23/10

Life is a two way street.

आज हा ही अनुभव घेतला. काय असतं "नोकरी जाणं"? जेव्हा हातातून काहीतरी निसटत असतं, तेव्हा आपल्याला काय काय मिळालंय, ह्याची जाणीव होणं?

लाखो लोक येतात आपापली स्वप्न घेऊन, अमेरिकेत. The American Dream.

१० खोल्यांचा महाल, त्यात संगमरवरी स्विमिंगपूल, दारात ४ गाड्या, घरात ४ मुलं..... सगळं मिळालंच पाहिजे, आणि ते ही भरभरून मिळालं पाहिजे हा अट्टहास म्हणजे खरं अमेरिकन स्वप्न नव्हे. आज जगात अमेरिकेची image काही ही असो, पण स्वत:च्या निष्ठेने आणि कष्टांनी, स्वतंत्रपणे जे हवं ते मिळवता येण्यासाठी जी सामाजिक घडण लागते, ती सगळ्यांना उपलब्ध असणं, हे खरं अमेरिकन स्वप्न आहे.

ह्याचा अर्थ असा नव्हे, की ह्या समाजात असमता नाही. पण जेव्हा अमेरिकेत पहिल्या वसाहती निर्माण झाल्या, तेव्हा जुन्या पश्चिमी राजवटीला पर्याय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कुणाच्या धर्म, जात, सामाजिक स्तरावरून त्यांच्या कर्तृत्वाची झेप ठरू नये, ह्या विचारातून capitalism आणि individualism चा उदय झाला.

गेली ५ वर्ष मी थोड्या अंशी ते अमेरिकन स्वप्न जगते आहे. आणि आज त्याचं झालेलं दु: स्वप्न ही अनुभवायला मिळालं. इतर कुठल्या देशातल्या विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी, मला इतकं सहज समजून घेतलं असतं? इतर कुठल्या देशात माझा रंग नाही, तर केवळ माझे विचार आणि गुणवत्ता हे निकष ठरले असते?

अर्थात, अमेरिकेतही वेगवेगळ्या राज्यांमधे खूप तफावत आहे, व्यक्तिसापेक्षही खूप तफावत आहे. पण माझ्यापुरतं, माझ्या छोट्या कुटुंबापुरतं तरी ते स्वप्न आजवर खरं होतं.

माझी नोकरी गेली. चूक कोणाची? कोण बरोबर? हे विचार आधी मनात आले ही होते. वेगवेगळ्या लोकांना (स्वत:सकट) दोष देऊन झाले ही होते. Rather, सगळंच एकट्या माणसाच्या खांद्यावर टाकून वर मानभावी पणे, "हे अमेरिका आहे- इथे कोणीही नशीब काढू शकतं, आणि तुम्ही नशीब काढलं नाही तर तुमच्यातच काहीतरी कमी आहे!" हे सांगणाऱ्या अमेरिकन स्वप्नाच्या विचारसरणीलाही निकालात काढून झालं.

पण आज जेव्हा ती वेळ आली, तेंव्हा मिटिंगरूम मधे गंभीर चेहऱ्याने मला "वाईट बातमी" सांगणारे लोकच मला स्वत:पेक्षाही जास्त ओशाळलेले वाटले. तेंव्हा मला पुन्हा आरशात लख्ख माझा चेहरा दिसला. कधी माझा वृथा अभिमान दिसला, कधी वैयक्तिक कारणांमुळे हरवलेल्या दिशा दिसल्या, कधी निव्वळ कामाने थकून गेलेला जीवही दिसला.

आणि मला कळलं- Life is a two way street. मनातून जी साद निघते, त्याचे अगदी तस्सेच पडसाद नियतीत/जगात/आसमंतात उठत असतात. आता थांबून पुन्हा मनन करायला हवे...

14 comments:

  1. It is very hard, no doubt; but hope you'll find a way out. Good luck!

    ReplyDelete
  2. काय देऊ प्रतिकिया.

    ..............

    दिस येतील,
    दिस जातील.

    Good like.

    ReplyDelete
  3. Thank you Canvas. You said it right. Hoping that neither the good nor the bad days last forever.

    ReplyDelete
  4. धन्यवाद कोहम! Right now, every cent counts :)

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  6. kharach farach chan lihitat tumhi

    ReplyDelete
  7. Thank you Sachin! Hopefully lihun mala tya depression madhun baher yeta yeil.

    ReplyDelete
  8. फारच छान लेख लिहिलाय.ई-सकाळ्मध्ये ही वाचला
    Good Luck

    ReplyDelete
  9. All the best. Thankfully ... time keeps moving. You will come out of it.

    p.s. - BTW I found this blog via esakal where they published this particular article. Not sure if you knew this.

    ReplyDelete
  10. Thank you! Yes, I know. They couldn't have/wouldn't have published it without my permission :)

    ReplyDelete
  11. Read your article in esakal. Frankly, the article did not clearly tell the reader about the situation you faced. It sounds muddled up.

    Such job cuts are expected in today's American economy...that is the price of over-rated capitalism paid by everyone.

    ReplyDelete
  12. सुजाता,

    तुमच्या मनापासूनच्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद!काही वाचकांना ह्यात बरीच पार्श्वभूमी (अमेरिकन ड्रीमची संकल्पना) "गृहित" धरल्यासारखी वाटू शकते. ती अजून सविस्तर सांगायचा यापुढे नक्कीच प्रयत्न करीन.

    अर्थात, माझा लेख,नोकरी कशी/का/कधी गेली, ह्या बद्द्ल नाहिये, आणि तो तसा करायचा ही नव्हता.

    नोकरी, पैसा असे पर्यंत अमेरिकन ड्रीम वर विश्वास ठेवून, त्याचा गौरव करणारे, नोकरी गेली, की मात्र लगेच अमेरिकेला, इथल्या भांडवलशाहीला नावे ठेवायला लागतात.

    तसा दृष्टीकोन न ठेवता, त्या अनुभवातून भरपूर शिकता येईल असं वाटतंय.

    ReplyDelete