मी अमेरिकन झाले आहे का?
आधी कधी हा प्रश्न स्वतःला विचारला नव्हता. तो विचारावा लागला कारण- खूप जुनी एक मैत्रीण भेटली. आम्ही लहान असतांना आमचं घर ७ खोल्यांचं आणि तिचं ४ खोल्यांचं हे तिलाच आठवलं, पण आत्ता ही तिचं घर ३ खोल्यांचं आणि माझं ५, हे पण तिला जाणवलं. तिने कौतुक केलं, माझं, माझ्या घराचं, माझ्या नवऱ्याचं, माझ्या दिसण्याचं, वागण्याचं आणि स्वयंपाकाचंही!
पण कौतुकात किती आनंद होता, आणि किती खंत? कितीशी जेलसी/असूया? जरा शंका आली, तरी मला भीती वाटली.
इतक्या वर्षांची मैत्री समतोल नव्हतीच म्हणजे! कुठेतरी वर-खाली पारडी तोलण्यात सदैव माझंच पारडं खाली राहिलं. नशिबाने मिळालेल्या घराने, रूपाने, पैशानेच का माझे गुण ही मला मिळाले होते? माझे गुण मी कितीही 'कमावले' असतील, तरी तिच्या मते ते माझ्या 'पदरात' च पडले असतील तर आमची घनिष्ठ मैत्री 'निखळ' मात्र कधीच नव्हती हे मला मान्य करावंच लागेल, त्याची मला खूप खूप भीती वाटली! ते विचार मी गेली अनेक वर्ष मनाच्या तळाशी दडपून टाकले.
म्हटलं तर माझ्या पेक्षा अनेक पटींनी तिचंच करियर नेत्रदीपक! पुढे शिकायला डिग्री उरली नाही इतकी ती शिकली, आणि दरवेळी सुवर्णपदकं मिळवत शिकली! जिथे गेली तिथे सर्वांची लाडकी झाली. आणि तरीही तिला माझी असूया? मी फक्त साधी शिक्षिका आहे, मला ना तिच्या इतके पैसे मिळतात, ना भोवती तिच्या इतके मैत्र! माझ्यापाशी कोणी आपले मन मोकळे करत नाही, आणि मी ही फार कोणावर विसंबत नाही. तिचे आईवडील आपला संसार सोडून तिच्या मुलीचा सांभाळ करायला सदैव पाठीशी उभे राहिले, पण माझ्याकडे अनेक कारणांनी तशी परिस्थिती कधीच येणार नाही.
मग असा फरक का? कदाचित गेली अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक होण्याने माझा सर्वात मोठा फायदा हा झाला की मला कुठेच कुणाशी तुलना करायची वेळ आली नाही, की सवय झाली नाही! त्यांच्याकडे मोठी गाडी, आपली लहान..... त्यांच्या दोन्ही रग्गड पगारी नोकऱ्या- माझी जेमतेम मुलाचा खर्च भागवणारी! असले विचार मी केलेच नाहीत कारण ह्या देशात माझ्या 'शिक्षकी' पेशात असलेलं दुसरं कोणी मला भेटलंच नाही, आणि जे थोडे भेटले, ते सगळे माझ्याच सारख्या परिस्थितीतून जातायत असं जाणवलं.
इथे येणारे सगळेच भारतीय (अनिवासी/इमिग्रंट) थोड्याफार फरकाने सारख्या टप्प्यातून जातात. आधी भाड्याचं घर, एखादी कार, व्हिसाची टांगती तलवार! त्यामुळे नवीन येणाऱ्यांबद्दल सहसा सहानुभूतीच जास्त!
अमेरिकन माणसाचा स्वभाव अघळपघळ, पण नसत्या चौकशा न करणारा. तासाचे ८ डॉलर मिळवणाऱ्या कॉफीशॉप मधल्या भारतीय/आशियाई दीदी पासून ते वॉलस्ट्रीट वर लाखो कमावणाऱ्या सुटा बुटातल्या दादा पर्यंत कुणाला एकमेकांच्या घरी किती सुबत्ता आहे, हे जाणून घेण्याची खाज नाही.
उलट भारतात शेजार्यांकडे नवीन सोफा, टीव्ही, कार आली कि लगेच कौतुक, नि लगेच असूया. अमेरिकेत 'भौतिक' सुखं आहेत असं म्हणतात, पण माझ्या साठी हे 'मानसिक' सुखच जास्त मोलाचं आहे!