पोर्तोरीकोच्या आमच्या घराला एक मस्त मोठ्ठी बाल्कनी होती. "बाल्कनीतून काय काय दिसतं?" म्हटलं, की झालीच पोराची लिस्ट सुरू..."बाल्कनीतून समुद्र दिसतो, नारळाची झाडं दिसतात, बिल्डिंग दिसतात, मोठ्ठी क्रूज शिप दिसते, दिवे दिसतात, रस्ता दिसतो, आणि रस्त्याच्या पलिकडे Luis Munoz Rivera पार्कपण दिसतो! खरंच तो फ्लॅट इतका समुद्राकाठी होता, की सॅन हुआनला क्रूजशिप आलेली दिसायची. मग आम्ही ठरवायचो, "आज गावात गर्दी असणार. आज डिनरला दुसरीकडे जाऊया!" रस्त्यापलिकडचा पार्क इतका ***पाशी होता, तरी बाहेर पडायची आमची अर्धी भूक त्या बाल्कनीतच भागायची, इतके आम्ही तिथे पडीक असायचो. तिला दारं होती, पण रात्रीशिवाय, ६ महिन्यात ६ वेळाही कधी ती कधी बंद राहिली नाहीत. असह्य उन्हातही बेडरूम किंवा टीव्हीच्या खोलीत ए.सी लावला, तरी बाल्कनीला रजा नसे.
पारदर्शी काचांच्या भिंती असलेल्या बाल्कन्या फक्त अब्जाधींशांच्या, जुहूच्या फ्लॅटच्या असतात, असंच ऐकलं होतं. पाहिल्यावर तर वेडेच झालो. एक महिनाभर मस्त वाटलं, पण भर रस्त्याच्या रहदारीमुळे, समुद्रावरच्या वाऱ्यामुळे, बाल्कनीत फार घाण व्हायची, नि तिथली धूळ माती सगळ्या घरभर पसरायची. म्हणून एकदा सरळ बादलीत पाणी घेऊन, पाईप लावून ती धुवायला घेतली, तर आमच्या पिटक्याला काय चेव आलाय विचारता! तो दिवसभर "little helper" होऊन बाल्कनी धूत बसला, आणि शेवटी "किती पाणी वाया घालवलंस बघ, नळातलं सगळं पाणीच संपून गेलं" असं सांगून त्याला उचलून बाथरूममधे न्यायला लागलं. खोटं कशाला सांगू, बाहेरही पडता येत नाही इतकं ऊन झालं, की "बाल्कनी धुणे" हा आमचा आवडता प्रोग्रॅम झाला :)
उन्हाळी प्रदेशात रहायचे सुख त्या बाल्कनीत बसलं, की जाणवे. वीकेंडला सकाळी उठल्याउठल्या नवरा शास्त्रीय संगीत लावतो, ते भरदार, भारलेले, भारावणारे सूर, आणि संगतीला पूर्वेकडून उगवणारा "दिनमणी व्योमराज"! मग दिवस चढत जातो तशी रहदारी वाढायची. सकाळी मी कानोसा घेतच असायचे, की "कचरू" कधी येेतो, कारण माझ्या छोट्याच्या जीवनातला तो एक मोठ्ठा आनंददायी प्रसंग होऊन बसला होता! (म्हणजे, कचऱ्याची गाडी. माझ्या भाच्याचा शब्दच मी माझ्या मुलाला शिकवला, पण कचरूचं वेड मात्र शिकवावं लागलंच नाही, कारण ते दोघांत अनुवांशिकच असावं :). न्यू जर्सीत बंगलेवजा घरांच्या कचरागाडीतून दोन कामकरी उतरतात, आणि एकेका घरासमोरची कचराकुंडी गाडीत ओतत पुढे जातात. हा "कचरू" मात्र वेगळा होता.
आम्ही आमचे कचरे खालच्या मोठ्या डंपस्टरात जाऊन टाकायचो, तो डंपस्टर उचलायला ह्या कचरूला दोन यांत्रिक हात होते. एवढा भला थोरला डंपस्टर कचरूच्या वर उचलून त्यात उलटा होतो, आणि कचरा आत पडतो, हा चमत्कार माझ्या पोराने प्रथमच पाहिला. ते ही ६ व्या मजल्याच्या बाल्कनीतून बघतांना अगदी नीट दिसतं. मग कचरूचं खेळणं घरी आलं. त्याच्यावर Tonka हे नाव छापलेलं होतं म्हणून कचरूचं पुन्हा बारसं होऊन "टोंका" झालं. जेवतांना टोंकाची गोष्ट. टोंकाच्या गोष्टीला डिस्ने कार्स ची फोडणी. हे सSSSगळं त्या एका बाल्कनी पासून सुरू झालं.
पोर्तोरीकोत भाषेच्या प्रश्नामुळे, आणि ६च महिने रहायचे असल्यामुळे, आमचा फारसा गोतावळा नव्हता, तरीही, त्या बाल्कनीने आमचे दिवस अळणी जाऊ दिले नाहीत. कधी त्यावरून सायकल मॅरॅथॉनची गडबड, तर कधी PREPA विरोधी रॅली, सर्कशीचे ट्रक गाणी बजावणी करत, तर पोलिसगाड्या किंवा ॲम्ब्युलन्स सायरनने बोंबलत जातांना बघणे, हे उद्योग मी आणि माझ्या मुलाने सारख्याच हिरीरीने केले.
मधमाशी, मुंगळे किंवा भुंगे जर बाल्कनीत आले, तर मग पुढचे दोन तास पिटक्याला ते पुरत. मुंगळा कुठे चढतो, तो पडेल ना! किंवा "बधमाशी" उडाली, कि ती फुलातून मध आणायला गेलीये" अशी वर्णनं ऐकायला मिळत. पक्ष्यांसाठी खरं दाणे ठेवू शकलो असतो, पण मला ज ब र द स्त पक्षी-फोबिया आहे म्हणून ते राहिलं. (नाही, हिचकॉकचा पिक्चर पाहिल्यामुळे तो झालेला नाही, कारण मी तो पिक्चर पाहिलाच नाहिये आणि कधी पाहणारही नाही.)
पाऊस पडू लागला, की तर माझ्या पोरापेक्षा मलाच जास्त भरतं यायचं, की "चला बाल्कनीत जाऊन पाऊस पाहू. पावसात भिजू!" पाऊस बघतांना झाडांचे इतके वेगवेगळे हिरवे रंग दिसायचे, की हरखून जायला व्हायचं. एरवी एवढ्या उकाड्यात गरम पेक्षा गार लिंबू सरबतच बरे वाटत असले, तरी केवळ त्या बाल्कनीला न्याय द्यायला कित्येकदा पावसात, किंवा संध्याकाळी मी चहा घेऊन तासंतास तिथे काढायचे." पुस्तकं वाचायला फारसा वेळ मला मिळत नसे, पण नवऱ्याने ४-५ ग्रंथ तिथे सहज संपवले.
आमच्या टिपिकल अमेरिकन घरची बाल्कनी म्हणजे, इमारतीला बाहेरून सजावट करावी तशी, आणि तीही privacy च्या दृष्टीने, घराच्या "उलट्या" बाजूला. गावगप्पा आणि चांभारचौकशा करण्यासाठी अगदीच बिनकामाची. सेक्स ॲण्ड द सिटी मधल्या कॅरी ब्रॅडशॉ "घरायेवढं कपडे-बुटांचं कपाट" असं स्वप्नरंजन करत असते, तशी मी, फक्त एका छोट्या खोलीएवढ्या बाल्कनीचे.
"खुर्चीवरी बसावे, रस्त्याकडे पहावे, चा-बिस्किटे चरावे, त्या बाल्कनीत माझ्या." असं संत तुकडोजी महाराजांनी म्हणूनच ठेवलंय ना :) :)

No comments:
Post a Comment