PRवास...........४ बाजारहाट

इथे आल्या आल्या घर सेट करण्यात थोडे दिवस गेलेआणि मग मी नेमाने वेगवेगळ्या ग्रोसरीजना भेट द्यायला सुरूवात केली. “खाद्यसंस्कृती अनुभवणे” असे गोंडस नाव दिलेतरी खरे म्हणजेपोटापाण्याची सोय बघणेहा खरा उद्देश एका ट्रॉपिकल बेटावर आपण आहोत, आणि जिथे तिथे पर्यटकांवर ट्रॉपिकल-संस्कृतीचा मारा होत असतो, त्यामुळे ते विसरण्याची शक्यताच नसते, म्हणून म्हटले चला, थोडेदिवस भारतात गेल्याचा अनुभव घेऊ- दुधाची तहान ताकावर भागवू.

नवऱ्याने तत्परतेने पेरूंची चौकशी सुरु केली, कारण रेस्टॉरंटमधे मेन्यूवर पेरू-आईस्क्रीम, पेरू-चीजकेक असले प्रकार दिसत. पण ग्रोसरीत गेलो, तर शोधूनही ताजे पेरू सापडत नव्हते. त्याने ॲफिसात सांगून ठेवले, की पेरू दिसले तर माझ्यासाठी घ्या, तेव्हा सहकारी म्हणाले, “इथे लोकांच्या घरी झाडं असतात, पण ताजे पेरू कोणी खात नाही!” आता घ्या! “गाढवाला गुळाची चव” म्हणावे, हसावे की रडावे कळेना!  शेवटी २ महिन्यांनी एका मैत्रिणीकडून कळले, की १० मैलावरच्या एका Freshmart मधे पेरू मिळताहेत. तिथे धाव घेतली, तर ते पेरू इतके काही केविलवाणे दिसत होते, कि कुणाचा विश्वास बसला नसता, म्हणून फोटो काढून २-३ घरी आणले. न्यू जर्सीला खोबरी पांढरे पेरू सर्रास मिळतात, पण हे (आतून) लाल गोड पेरू होते! मग का बरं कुणाला यात रस नसावा? पेरू तर पेरूच शेवटी, पण फळांचा राजा आंब्यांचीही तीच कथा? भारतात आंब्याच्या मोसमात किती वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आपण आणून खातो. इथे मात्र एकच एक मेक्सिकन प्रकार, खूप शिरा आणि किंचित आंबटगोड चव असलेला.


मग नवऱ्याने सहकाऱ्यांसमोर हापुसचे कौतुक केले, तेव्हा एकाने “घरचे” म्हणून ४-५ आंबे दिले. बाहेरून पूर्णपणे हिरवे होते, काळ्या डागांमुळे आधीच खराब झाले कि काय, असे वाटून चिरले, तर आतून चक्क दुसरा हापूसच! आता हेच आंबे, बाजारात का नाहीत? ह्याला उत्तर नाही. अगदी सुरूवातीला प्लाझा मर्काडो नावाची एक मंडई आम्ही शोधून काढली होती. तिथे तोडक्या मोडक्या स्पॅनिशमधे भाव करतांना माझी तारांबळ उडाली, आणि “नवीन पाखरू दिसतंय” ह्याचा फायदा घेऊन भाजीवाल्यांनी चांगलेच लुबाडले होते. तो अनुभव फक्त एका चिकूसाठी लक्षात आहे. चिकूला इथे “सापोता” म्हणतात. रोजच्या बाजारात तो ही दिसत नाही, पण इथे अगदी मोठ्ठा होता. एकाच फळातून इतका केशरी गर निघाला, कि त्याचा मिल्कशेक करूनच संपवावा लागला. आपल्या देसी चिकूंपेक्षा अगदीच कमी गोड/कमी चवदार वाटला. 

म्हणायला ताज्या चिंचा, कच्ची+ पिकलेली केळी रस्त्यावर फेरीवाल्यांकडे दिसली. कच्ची केळी ही राष्ट्रीय भाजी आहे असे म्हणायला हरकत नसावी, कारण “मोफॉन्गो” नावाच्या सर्वाधिक लोकप्रीय प्रकारात तर ती घालतातच, शिवाय उकडून, तळून, कुटून, अगदी सर्वप्रकारे त्यांचा मारा करतात. एक-दोनदा खाऊन आमचे त्याबद्द्लचे कौतुक सरले, आणि मग मी शुद्ध देशी प्रकाराने कढीलिंब आले-लसूण मिरची घालून त्याची बटाट्यासारखी भाजी करू लागले. ­­(कढीलिंब मला न्यूजर्सीतून येणाऱ्यांकडून मागवावा लागतो, आणि आणल्यावर फ्रीजरमधे ठेवून पुरवून पुरवून वापरते.)

नारळाचे पाणी मात्र सुदैवाने जागोजागी मिळते. "हे कोको फ्रीयो!" (Hay Coco Frio) Hay हे उद्गारवाचक पार्कींग-बंदी, किंवा इतर नोटिसांवर असते. कोको= कोकोनट, फ्रीयो=गार. मग कळले की नारळांना बर्फात ठेवून गार करतात, किंवा काही ठिकाणी खास एक गार करण्याचे यंत्र असते. आता तर "हे कोको फ्रीयो!" असा बोर्ड कुठेही दिसला, की आम्ही पण सुरात ओरडतो, "हे कोको फ़्रीयो!" पण फ्रोजन खोबरे (न्यूजर्सीत मिळणारे), त्याचा इथे पत्ता नाही! एकदा नारळ घरी आणलाही, पण तो फोडावा कसा? मग अपार्टमेंटच्या चौकीदाराकडून हाथोडा उधार मागितला, तर त्याने आम्हाला, “तुम्हा पर्यटकांना नस्त्या उचापती सुचतायत” असे भाव चेहऱ्यावर आणून मला नारळ फोडून दिला. मग पुन्हा मी त्याच्या वाटेला गेले नाही.

बेटावर देशातल्यासारखी रेलचेल नसणारहे अपेक्षित होतेतरीही, बाजारात दरवेळी दुहेरी धक्का बसतोएकतर गाजरभोपळी मिरचीभोपळाबटाटा कांदाह्या रोजच्या ७-८ भाज्यांव्यतिरिक्त काहीही दिसत नाही! म्हणायला मिरच्यांचे १० प्रकार (पोब्लानोसिरानोआलापीनोपिमेन्टो याशिवाय अनेक नवीन प्रकार होते)पण ताज्या देशी भाज्याच कायइथे तर फ्रेंचबीन किंवा पालकही दुर्मिळच! आणि दुसरे म्हणजे१० भेंड्या ४ डॉलर१५ फरसबी प्लॅस्टिकच्या डब्यात सुरेख पॅक करून ५ डॉलरआणि पावभर पालकची पिशवी  डॉलरअसले भाव बघून डोळेच फाटले! पोरासाठी सहसा ऑर्गेनिक दूध घेतोम्हणून ते शोधायला गेलोतर साधे गॅलन दूधच ऑर्गेनिकच्या भावातआणि ऑर्गेनिकचा तर पत्ताच नाही! शेवटी फ्रोजन मधे खूप शोधून पालक, मुळ्याचा पाला, बीन्स वगैरे­­ दिसल्या. ते ही शनि-रवि च्या गर्दीत गायब असतात, आणि सकाळी लवकर गेलो तरच गावतात.

बरेभाज्या एक महागपण फळंतीच कथा. देशात कॅलिफोर्निया महाग, तर न्यू जर्सी बऱ्यापैकी स्वस्त म्हणतात, पण इथे तर त्यापेक्षाही महागाई वाटली. चौकशीनंतर कळलं, की जवळच्या डॉमिनिकन रिपब्लिक, हैती, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, कोस्टारीका अशा इतर बेटांवरूनही माल येतांना मुख्य देशाद्वारे येतो, म्हणून अतिशय महाग पडतो. तसंच, पोर्तोरीकोत शेतकी-उद्योग फारसा नाही, पर्यटनावरच अर्थव्यवस्था चालते. “ट्रॉपिकल” म्हटली जाणारी फळंसुद्धा बाहेरूनच आयात होतात, ह्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.


मेथीतोंडलीगवार बघून तर आता काळ लोटलायपण त्या ऐवजीबऱ्याच नवीन गोष्टींशी तोंडओळख झाली. भरपूर आणि स्वस्त काही असेलचतर सर्व प्रकारचे कंद. रताळीअळकुडीशिवाय लांबट चॉकलेटी यूकाटारो (taro), रूटाबागाअक्षरश: दगडा सारखे दिसणारेआणि जड टारोचे खोड.  ते घरी आणायची हिम्मत मी अजून केली नाहीतरी बाकी बरेच प्रयोग झाले. 

यूका कंदाचा साबूदाणा करतात असे इंटरनेटवर शोधून कळले, तर मी लगेच किसून, कांदा, मिरची कोथिंबीर घालून त्याची थालीपीठे केली. अगदी सोप्पी आणि छान झाली!  फणसाचा भाऊ “ब्रेडफ्रूट” आणला, त्याची श्रीलंकन पद्धतीने नारळाच्या दुधातली भाजी केली.  केनेपा हे लिची+लिंबूची चव असलेले फळ फारच मस्त वाटले. मला त्यावरून "ताडगोळ्यांची" आठवण आली. तर स्टारफ्रूटपॅशनफ्रूटचायनीज ॲपल, हे एकेकदा खाऊन बघावे, इतपतच आवडले. एक केशरी रामफळासारखे दिसणारे फळ आतून थोडे सीताफळासारखे लागत होते. त्याचा गर क्रीमचीजमधे घालून ब्रेडवर लावता येतो, असं कळलं. लगेच प्रयोग संपन्न! भाज्या-फळांची मूळ नावे स्पॅनिशमधे लक्षात न राहिल्यामुळे, आधी माहिती काढून मग विकत आणायचे, हे जमायला वेळ लागला. शिवाय, एकाच पदार्थाला वेगवेगळ्या करीबियन ठिकाणी वेगवेगळी नावे, त्यामुळे त्याच्या पाककृती शोधायलाही फारच वेळ लागातो. 

"अरे, हे तर आपले......" असे साक्षात्कार फार कमी वेळा झाले, आणि शेवटी, इथले ट्रॉपिकल आपल्या भारतीय ट्रॉपिकलशी जरासे मिळतेजुळते, आणि बरेच वेगळे आहे, असा निष्कर्ष काढला. मुळात, भाज्या फळे खाण्यापेक्षा, इथे मांसाहारावर जास्त भर आहे. जसजशी इथली खाद्यसंस्कृती कळत जाते, तसतसा माझा भारतीय पाककलेचा अभिमान जास्तच वाढतो, कारण उष्ण हवामानात, काय आणि कसे शिजवायचे, कसे टिकवायचे, कसे रूचकर बनवायचे, ह्याचा खूप विचार आपल्या पाकशास्त्रात केलेला आहे. साधी आंबापोळी घ्या. एकही प्रीझर्वेटीव न टाकता जे बनवता येते, तेच इथे pectin घालून कृत्रिमरित्या बनवतात. चिंचेत किंवा आंबट रसात मुळात "उष्णताहारक" गुणधर्म आहेत, पण इथे कुठल्याही पदार्थात चिंच घातलेली दिसली नाही, फक्त चिंचेचे आईस्क्रीम, किंवा चिंचेचा ज्यूस नाविन्यपूर्ण म्हणून विकतात. पण ह्या छोट्या फरकांचा पण एक स्वतंत्र लेखच होईल, म्हणून इथेच थांबते. 

No comments: