12/10/08

झाड

ते एकटं, चैतन्याने सळसळणारं, स्थितप्रज्ञ.
मी गराड्यात, उरापोटी धावणारी, थकलेली.

त्याची अपार माया, पानापानांतून वाहणारी.
माझं मीपण कोंडून ठेवल्यागत, आसक्त.

त्याचा डौल- ते सृजन! ती नव्हाळी!
माझं पिकलेलं मन, अंतर्नादविहीन- तरी ही जिव्हाळी?

त्याचं जमीनीशी अतूट नातं, मुळांतून नसानसांत भिनलेलं.
माझी आधांतरीची फडफड, वठू पाहणाऱ्या जीवनाची.

त्या झाडाच्या सावलीत वाटतं
पुढच्या जन्मी तरी झाड व्हावं.

कारणांची गरज नसलेलं जगणं कळावं-
वाऱ्यात भरून मनांमधे सळसळावं!

2 comments:

यशोधरा said...

>त्याची अपार माया, पानापानांतून वाहणारी.
माझं मीपण कोंडून ठेवल्यागत, आसक्त.

सुरेख..

Anand Sarolkar said...

>> ते एकटं, चैतन्याने सळसळणारं, स्थितप्रज्ञ.
मी गराड्यात, उरापोटी धावणारी, थकलेली. <<

Kay class suruvat keli ahes!
Apratim :)