7/15/09

माझी भारतात न्यायची सूटकेस

माझी भारतात न्यायची सूटकेस
भरतेय हळूहळू
अपेक्षांनी, लाडिक हट्ट, उंचावलेल्या भुवया, निरागस कुतुहल
क्वचित, ओथंबलेल्या अश्रूंनी.


जुने झालेले कपडे तिथे "देऊन टाकायला" नेतांना
स्वत:च ओशाळी
“शोभेच्या वस्तू गुंडाळायला बरे पडतात
जुने कपडे!” समर्थनासाठी.

सुटकेसचे एक एक पदर रचतांना
कुठून अचानक कुणाची आठवण
घमघमली. पिवळ्याधमक गर्द झेंडूची भेट
आता काय न्यावी त्यांना परतभेट? - पर्फ्यूमची बाटली???

एक एक वस्तू शक्यतोवर
सुट्या सुट्या खोचल्या तरीपण
आपल्या पोत, जाडी, आकारासकट
आदळणार एकमेकींवर- एअरपोर्टवरच्या मिठीगत
ते प्रेम होतं- की परिस्थितीनुसार-
फक्त व्यवहार?

पिकासोच्या चित्रासारखे
चित्रामागून उलगडताहेत
एक एक कोपरे.
कितीही झाकलं तरी बोडकेच राहणारे.

पिकासोने स्त्री पाहिली
आरशातून प्रत्येक अंगाने
स्वत:लाच न्यहाळणारी.

तशी माझी सूटकेस
थोड्या आनंदाने, थोड्या अनिच्छेने
प्रवासाला निघतेय.

5 comments:

रोहन... said...

वा ... परत जात आहात भारतात ... शुभेच्छा ...

स्वतःच्या भावना सुंदर पद्धतीने शब्दात उतरविल्या आहेत ...

रोहन... said...

why cant i follow ur blog ?? u hv not kept that option ???

pls update blog settings so that i can follow ur blog ... thnx .. !!

विशाखा said...

Thank you!

Added "Followers" functionality- hopefully it will work :)

कोहम said...

sundar

अवधूत डोंगरे said...

[जुने झालेले कपडे तिथे "देऊन टाकायला" नेतांना
स्वत:च ओशाळी
“शोभेच्या वस्तू गुंडाळायला बरे पडतात
जुने कपडे!” समर्थनासाठी.]

[सुटकेसचे एक एक पदर रचतांना
कुठून अचानक कुणाची आठवण
घमघमली. पिवळ्याधमक गर्द झेंडूची भेट
आता काय न्यावी त्यांना परतभेट? - पर्फ्यूमची बाटली???]

hee don kadavi aavadali.