शॅम्पू ने डोक्यात गळू होईल!
आकलनाच्याही आधी एक निमिष होता
मी तिथेच थांबायला हवे होते
पण तोवर डोळ्यात घुसून
संवेदना मेंदू पर्यंत पोचली होती.
षट्कोनी भोकांमधून
आळ्यांचे डोळे
केसांच्या खाली, सपाट गोऱ्या मानेवरून
माझ्याकडे बघत होते.
मी गप्पकन डोळे मिटून घेतले
तरी पटलावर कोरलेली ती भोकं
त्यातून वळवळणारे लक्ष डोळे
तोंडात अचानक दाटून आलेले दर्प
हातापायांना सुटलेला कंप
एक असहाय चीड उठून मग जुळवली बोटं
एक एक चौकोनावर आघात करत,
"शोधा" त लिहिलं: "शॅम्पूचं गळू खरं आहे काय?"
कमळ- कंदाच्या षट्कोनी पोवळ्यातून
गुलाबी पाकळ्या फुटतांना पहिल्या
त्याच डोळ्यांनी.
"खरं आहे काय?" काय खरं आहे?
'माझ्या' शोधाच्या 'चौकटीतून' कापून
त्याला शंबर ठिकाणी चिकटवलं
सीमेवर परत पाठवलं
आणि सांगितलं, "आता कर आक्रोश!"
निवायला हवे आहेत मला माझे डोळे - स्वच्छ प्रकाशाने.
डोळ्यांवर अत्याचार केला होता
ती मैत्रीण आता मला फुलं पाठवते
रोज सकाळी - गुड मॉर्निंग!
कळवळा आहे तिला माझा
टीप: खोटी प्रतिमा इथे देऊ इच्छित नाही, त्यामुळे कुतूहल असल्यास Shampoo Hoax शोधावे. कमळाच्या बिया बाहेर पडत असतांनाचा फोटो मानेवर चिकटवून भयानक रोग भासवला गेला आहे.
सध्या अमेरिकन निवडणुकी संदर्भात जालावर फिरणाऱ्या बातम्या (बहुतांशी खोट्या) असूनही जनमत बदलून गेल्या. निवडून आल्यावर राष्ट्राध्यक्षानी केलेली विधाने, दोन्ही बाजूंची वृत्तपत्रे, यांनी नि:पक्षपाती पत्रकारितेचा परिहास केला आहे! त्या पार्श्वभूमी वर माझा एक व्यक्तिगत अनुभव म्हणून वरील कविता लिहिली आहे.

आणि मी पण रोज डोळे मिटून
कमळ-कंदातुन उमलणाऱ्या पाकळ्या आठवते.