काही दिवसांपूर्वी नेटफ़्लिक्सवर ग्रफेलो (Gruffalo)नावाची छोटी कथा बघायला मिळाली. इतकं अप्रतीम लेखन, ॲनिमेशन, डबींग आणि पार्श्वसंगीत छोटयांनाच काय, पण मोठ्यांनाही खिळवून ठेवेल असं आहे. आधी कल्पना नव्हती, पण शोधल्यावर कळलं, की जूलिया डोनाल्डसन ही लेखिका तिच्या "ग्रफेलो" साठी जगप्रसिद्ध आहे, आणि Children's Laureate सन्मानार्थीही. चित्रकार ॲक्सेल शेफ्लरने इतकी उत्तम कामगिरी बजावलिये, की पुस्तक उघडल्याक्षणीच तुम्ही क्षणात एका घनदाट जंगलात जाऊन पोचता. इतक्या बोलक्या चित्रांना, ॲनिमेशनने अर्थात् संजीवनीच मिळते असं म्हणायला हरकत नाही, आणि मधूर, तरीही गूढ-भयावह अशा पार्श्वसंगीताने तर ह्या गोष्टीला चार चाँदच लावलेत. ह्या पुस्तकाचा अनुवाद करायचा इथे प्रयत्न करतेय. सुरूवातीला पोराला जेवता-झोपता-उठता-बसता सारखी ग्रफेलोची गोष्ट लागायची. ती इंग्रजीत पाठ होईतोवर मी मराठीतच सांगत असे. पण मूळ इंग्रजीतली लय त्यात यायची नाही. म्हणून हा प्रयत्न.
पिटुकल्या उंदराला वाटलं कधीतरी
जंगलातून मारावी छोटीशी फेरी.
कोल्होबाने उंदराला वेळीच हेरलं
एका उडीत त्याला पंजात धरलं.
"उंदीरमामा चला माझ्या बिळातल्या घरास,
केलिये मेजवानीची तयारी खास !"
(कोल्हा लबाड, करणार वाटतं माझाच घास!)
"नको नको कोल्होबा," उंदराने विनवलं,
तो तिकडे ग्रफेलो, माझी वाट पाहतोय म्हटलं!
"ग्रफेलो? ग्रफेलो?
हा कोण असतो?"
"कोल्होबा, तुम्हाला ठाऊक कसं नाही?
ग्रफेलोचा पंजा बघूनच घाबराल तुम्ही.
अजस्त्र जबड्यात त्याच्या, दात, जसे खिळे!
डोकावतात बाजूने दोन मोठे सुळे!"
"बरं बरं उंदिरमामा, इतकंच बोला,
कुठे भेटणार तुम्ही, ह्या ग्रफेलोला?"
"इथेच तो येणारे, ह्याच खडकावरी,
त्याला खायला आवडतं, कोल्ह्याचं-तंदूरी"
"ठीकठीक" कोल्हा म्हणाला घाबरून,
शेपूट घातली पायात, नि ठोकली तिथून धूम.
"वेडा रे कोल्हा, त्याला कळलंच नाही,
ग्रफेलो, असं कुठे नसतंच काही!"
“घुबडदादा तुझा आग्रह एरवी कसा मोडवेल?
पण ग्रफेलो फुका माझी वाट बघत रडेल.”
(घुबडाघरचा चहा, मला महागात पडेल.)
पिटुकल्या उंदराला वाटलं कधीतरी
जंगलातून मारावी छोटीशी फेरी.
कोल्होबाने उंदराला वेळीच हेरलं
एका उडीत त्याला पंजात धरलं.
"उंदीरमामा चला माझ्या बिळातल्या घरास,
केलिये मेजवानीची तयारी खास !"
(कोल्हा लबाड, करणार वाटतं माझाच घास!)
"नको नको कोल्होबा," उंदराने विनवलं,
तो तिकडे ग्रफेलो, माझी वाट पाहतोय म्हटलं!
"ग्रफेलो? ग्रफेलो?
हा कोण असतो?"
"कोल्होबा, तुम्हाला ठाऊक कसं नाही?
ग्रफेलोचा पंजा बघूनच घाबराल तुम्ही.
अजस्त्र जबड्यात त्याच्या, दात, जसे खिळे!
डोकावतात बाजूने दोन मोठे सुळे!"
"बरं बरं उंदिरमामा, इतकंच बोला,
कुठे भेटणार तुम्ही, ह्या ग्रफेलोला?"
"इथेच तो येणारे, ह्याच खडकावरी,
त्याला खायला आवडतं, कोल्ह्याचं-तंदूरी"
"ठीकठीक" कोल्हा म्हणाला घाबरून,
शेपूट घातली पायात, नि ठोकली तिथून धूम.
"वेडा रे कोल्हा, त्याला कळलंच नाही,
ग्रफेलो, असं कुठे नसतंच काही!"
=0=0=0=0=0=
कोल्ह्याच्या हातावर देऊन तुरी
पुढे निघाली उंदराची स्वारी
नेमकी घुबडाच्या नजरेस पडली
घुबड झेपावला वेगाने खाली.
पुढे निघाली उंदराची स्वारी
नेमकी घुबडाच्या नजरेस पडली
घुबड झेपावला वेगाने खाली.
“कसं काय उंदिरमामा, निघालात कुठे?
माझ्या घरट्यात या, खाऊ चहा बिस्किटे!”
माझ्या घरट्यात या, खाऊ चहा बिस्किटे!”
“घुबडदादा तुझा आग्रह एरवी कसा मोडवेल?
पण ग्रफेलो फुका माझी वाट बघत रडेल.”
(घुबडाघरचा चहा, मला महागात पडेल.)
“ग्रफेलो? ग्रफेलो? हा कोण बुवा?”
“घुबडदादा तुला माहित असायलाच हवा.
झाडाच्या खोडासारखे खडबडीत त्याचे पाय”
“बापरे उंदीरमामा, खरंच की काय”.
नाकावर त्याच्या विषारी पुटकुळी,
आणि धारदार नखं बघून बसेल दातखिळी.”
“घुबडदादा तुला माहित असायलाच हवा.
झाडाच्या खोडासारखे खडबडीत त्याचे पाय”
“बापरे उंदीरमामा, खरंच की काय”.
नाकावर त्याच्या विषारी पुटकुळी,
आणि धारदार नखं बघून बसेल दातखिळी.”
“बरं बरं उंदीरमामा, येवढंच बोला,
कुठे भेटताय तुम्ही ह्या, ग्रफेलोला?”
“ठरलं होतं इथेच नदीपाशी भेटायचं.
कारण त्याला फार आवडतं आईस्क्रीम घुबडाचं.”
कुठे भेटताय तुम्ही ह्या, ग्रफेलोला?”
“ठरलं होतं इथेच नदीपाशी भेटायचं.
कारण त्याला फार आवडतं आईस्क्रीम घुबडाचं.”
“ठीक ठीक” अशी घुबडाने केली चिवचिव,
आणि गेला उडून, मुठीत धरून जीव.
“वेडा रे घुबड, त्याला कळलंच नाही,
ग्रफेलो, असं कुठे नसतंच काही!"
आणि गेला उडून, मुठीत धरून जीव.
“वेडा रे घुबड, त्याला कळलंच नाही,
ग्रफेलो, असं कुठे नसतंच काही!"
No comments:
Post a Comment