अनाम सर्व दु:खांचे एकच हो नाव तू
नेमका कातरवेळी अस्त होऊन 'पाव' तू!
बोचरे डोळ्यात पाणी, करावया वाहते
जे असेल सत्य ऐसे मी मनात मानिले
घ्यायला लावू नकोस मज त्याचा ठाव तू
रुजला असेल खोल स्नेह विश्वासामधे
विचारून घालू नको अर्थांचे घाव तू
लहरींतून आठवेन गाणे अंधूकसे
दाही दिशा पसरल्यात एकट्या माझ्यापुढे
निर्वात अस्तित्वाचे ओसाडसे गाव तू
नेमका कातरवेळी अस्त होऊन 'पाव' तू!
बोचरे डोळ्यात पाणी, करावया वाहते
वाळूकण शिंपल्यात कर तसा शिरकाव तू
जे असेल सत्य ऐसे मी मनात मानिले
घ्यायला लावू नकोस मज त्याचा ठाव तू
रुजला असेल खोल स्नेह विश्वासामधे
विचारून घालू नको अर्थांचे घाव तू
लहरींतून आठवेन गाणे अंधूकसे
सूर स्पष्ट लावण्यास कर परी मज्जाव तू
दाही दिशा पसरल्यात एकट्या माझ्यापुढे
निर्वात अस्तित्वाचे ओसाडसे गाव तू
2 comments:
💕
💕
Post a Comment