घुबडाच्या हातावर देऊन
तुरी, पुढे निघाली
उंदराची स्वारी
नागोबा तेवढ्यात सळसळत आला,
फणा काढून गोड तो
बोलला
"उंदीरमामा,
तुला इतकी कसली
घाई?
माझ्या घरी चल,
करतो मस्त सरबराई!"
"तुझ्या घरी,
त्या ओंडक्यांच्या खाली
नागोबा, असेलच ना
गाSSर सावली
(मलाच कशाला
ही अवदसा आठवली?)
पण आज
नको, मी आहे फारच घाईत
ग्रफेलोला भेटलो नाही,
तर होईल पंचाईत!"
"ग्रफेलो,
ग्रफेलो? तो कोण
असतो?"
"नागोबा तुला
माहित कसं नाही?
ग्रफेलोसमोर तुझं काही
खरं नाही!
डोळ्यात त्याच्या पेटल्याहेत
केशरी ज्वाळा
जीभेचा रंग
तर रात्रीहून काळा
पाठीवर फुटलेत
जांभळे काटे
दुरून दिसला,
तरी फार भीती
वाटे!"
"बापरे!
उंदीरमामा, इतकंच बोला
कुठे भेटणार तुम्ही
ह्या ग्रफेलोला?"
"इथे, ह्याच तळ्यापाशी येईन,
तो म्हणाला
सापांच्या शेवया खाईन, तो
म्हणाला!"
“"बरं बरं उंदीरमामा!
टाटा बाय बाय,
मला फक्त फणाच,
पण का नाहीत
पाय?"
नागोबाने जाताजाता केली सळसळ,
आणि गवताच्या वाटेने
काढला पळ!
"वेडा रे नागोबा!
त्याला कळलंच नाही
ग्रफेलो असं मुळी नसतंच काही!"
== 0==0==0==0
शेफारल्या उंदराला स्फुरणच चढलं
कोल्हा, घुबड, सापाला
त्याने वेड्यातच काढलं
तितक्यात हादरले डोंगराचे
कडे
मोठा एक पंजा
पडला डोळ्यापुढे
अजस्त्र जबड्यात, दात, जसे
खिळे!
डोकावत होते बाजूने
दोन मोठे सुळे!
झाडाच्या खोडासारखे खडबडीत त्याचे
पाय
उंदराला झालं दे
माय धरणी ठाय
नाकावर दिसली विषारी
पुटकुळी,
आणि धारदार नखं
बघून बसली दातखिळी
डोळ्यात त्याच्या पेटल्या केशरी
ज्वाळा
जीभेचा रंग तर
रात्रीहून काळा
पाठीवर त्याच्या जांभळे काटे
फुटलेले
उंदराला आता कापरेच
भरलेले
"देवा मला वाचव,
आता मात्र मी
मेलो!
हाच तो, हाच
तो, हाच तो ग्रफेलो!" (तिसरा, शेवटचा भाग लवकरच टाकते!)
No comments:
Post a Comment